शनिवार, 7 फेब्रुवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

प्या टॉमेटोचा रस

tomato
लालचुटूक, रसाळ टॉमेट पहिल्यावर तोंडाला पाणी सुटतं. टॉमेटोमुळे जसा आपल्या जेवणाला स्वाद येतो तसंच आजारपणात टॉमेटो खाल्ल्याने तोंडाला चवही येते. असा हा टॉमेटो आपल्या आरोग्यासाठी जितका उपयुक्त आहे. तितकाच किंवा त्यापेक्षा कांकणभर जास्त लाभदायक आहे तो टॉमेटोचा रस. त्यामुळे नुसता टॉमेटो खाण्यापेक्षा त्याचा ताजा रस काढला तर आपल्या शरिराला अनेक पोषणमूल्ये मिळू शकतात. टॉमेटोचा रस हा खनिजं आणि जीवनसत्वांचा एक प्रभावी स्त्रोत आहे. अ, के, बी 1, बी 2, बी 3, बी5, बी 6, इतकी जीवनसत्त्वे टॉमेटोच्या रसाच्या सेवनाने मिळू शकतात. एवढचं नाही तर लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस अशा खनिजांनीही टॉमेटोचा रस समृद्ध आहे. हे घटक तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी तर उपयुक्त असतातच. पण केस आणि त्वचेचे आरोग्य राखण्यात ही त्यांची महत्वाची भूमिका असते. टॉमेटोचा कृत्रिम रस पिण्यापेक्षा तो घरीच काढा. यासाठी ताज्या, रसाळ टोमॅटोचा वापर करा. टॉमेटोच्या रसातले अनेक घटक आरोग्यासाठी किती लाभदायक असतात हे जाणून घेतले की त्याचे आहारातल महत्व तुमच्या लक्षात येईल - 
 
टॉमेटोच्या रसात लायकोपीन नावाचा घटक असतो. या घटकामुळे प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो. टॉमेटो  
टॉमेटोमधील भरपूर फायबर आणि पाणी यामुळे आतड्याचं कार्य सुरळीत सुरू राहतं. 
 
बद्धकोष्ठ, अतिसार आणि पचनसंस्थेच्या इतर तक्रांरीवर टॉमेटोचा रस प्रभावशाली असतो. 
 
शरीरातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यासाठी टोमॅटोचा उपयोग होतो, असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यातल्या फायबरमुळे एलडीएल म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं. 
 
मधुमेह, अस्थमा आणि हृदयविकार अशा रोगांमध्ये होणार्‍या दाहावर टॉमेटोमधली अँटीऑक्सिडंट्स प्रभावी ठरतात.