बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Updated : सोमवार, 19 जून 2023 (07:33 IST)

गुणकारी दुधीभोपळा

lauki
भोपळा ही अनेकांची नावडती भाजी, भरीत, कोशिंबिर, सूप असे पदार्थ भोपळ्यपासून बनवले जातात. कितीही नावडता असला तरी गुणधर्मामुळे थोड्या प्रमाणात का होईना, परंतु प्रत्येकाने भोपळा खायलाच हवा. चेहर्‍यावर पडणार्‍या सुरकुत्यांपासून पोटाच्या गंभीर विकारांवर भोपळा गुणकारी ठरू शकतो. भोपळ्याच्या अशाच काही औषधी गुणधर्माबाबत जाणून घेऊ. 
 
भोपळ्यात 'बिटा करोटिन'  या घटकाचं प्रमाण बरंच जास्त असतं. यामुळे भोपळा हा अ जीवनसत्त्वाचा समृद्ध स्त्रोत मानला गेलाय. बीटा केरोटिनमधील आँटिऑक्सिडंट्‍समुळे शरीरातील फ्री रेडिकल्सचा सामना अगदी सहज करता येतो. 
 
भोपळा हे तापावरचं औषध आहे. 
 
भोपळ्यातील विशिष्य प्रकारच्या खनिजांमुळे मेंदूच्या नसांना आराम मिळतो. 
 
हृदयरोग्यांसाठी भोपळा वरदान मानला जातो. भोपळ्यात कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता असते. 
 
आतड्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनंही भोपळा गुणकरी मानला जातो. भोपळ्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. 
 
बहुसंख्य महिलांमध्ये लोहाची कमतरता आढळते. अशा महिलांनी भोपळ्याच्य बियांचं सेवन करावं. भोपळ्याच्या बियांमध्ये लोह, झिंक, पोटेशियम आणि मॅग्नेशियम यांचं प्रमाण भरपूर असल्यानं बरेच लाभ होतात. 
 
पोटाच्या विविध विकारांवर भोपळा गुणकारी ठरू शकतो. यातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट स्वच्छ झाल्याने अनेक रोगांना दूर ठेवता येतं.