औषधी दुधी भोपळा
दुधी भोपळा म्हटले म्हणजे अनेक जण नाके मुरडतात. मात्र तो किती गुणकारी आहे, याबद्दल तुम्हाला कदाचित माहीत नसावी. दुधी भोपळा औषधी भाजी असून त्यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे आहेत. तंतुमय, रेषादार तसेच जीवनसत्त्व 'क' असलेली फळभाजी दुर्लक्षित आहेत. मात्र, आता हळूहळू त्यांचे महत्त्व नागरिकांना पटत असल्याने ते खाण्याचे प्रमाण वाढले आहे.
* हृदयविकाराच्या रूग्णांना दुधी भोपळ्याचा रस सकाळ-संध्याकाळ एक-एक वाटी दिल्यास रोहिण्यांमधील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
* दुधीभोपळ्याचा रस एक वाटी, लिंबाचा रस एक चमचा व एक चमचा मध एकत्र करून दिल्यास मुत्रविकार कमी होतात.
* रोज सकाळी काही न खाण्याआधी अर्धा वाटी दुधीभोपळ्याचा रस व एक चमचा आल्याचा रस पाण्यात मिसळून घेतल्यास स्थूलपणा कमी होतो.
* दुधी भोपळ्याच्या एक वाटी रसात एक चमचा मध व चिमुटभर जायफळ पूड मिसळून तयार झालेला तेप त्वचेवर लावल्याचा कांती उजळते.
* एक चमचा आवळा चुर्ण भोपळ्याच्या रसात रात्री कोमट पाण्यात घेतल्याने झोप चांगली लागते. तसेच पोट साफ होते.
* दुधी भोपळ्याचा एक वाटी रस एक चमचा ओवा, चिमुळभर काळेमीठ घालून गरम करून ते चाखल्याने पोटाचा फुगीरपणा कमी होतो.
* दुधीभोपळ्याचा रस आटवून त्यात एक मिरा व पिंगळी वाटून त्यात एक चमचा मध मिसळून त्याचे चाटण लहान मुलांना दिल्यास छातीतील कफ दूर होतो.