औषधीयुक्त चंदन!
WD
चंदन पावडर पाण्यात उकळून घ्यावी व अंघोळीच्या पाण्यात हे पाणी मिसळून अंघोळ केल्याने संपूर्ण दिवस शरीर ताजेतवानं राहते.
गुलाब पाण्यात चंदन टाकून त्याचा लेप लावल्याने पिंपल्स येत नाहीत.
कच्च्या दुधात चंदन पावडर मिसळून पेस्ट बनवावी व ही पेस्ट चेहर्यावर लावल्याने चेहरा चमकदार होतो.
चंदन फक्त थंडावाच देत नाही तर हे एक औषधही आहे. कोरड्या शुष्क त्वचेसाठी चंदन वरदान आहे. चंदनाचा वापर साबण, डिटर्जेंट, कॉस्मेटिक, परफ्यूम, आफ्टर शेव, उदबत्ती बनवण्यासाठी केला जातो. चंदनाचे तेल व पावडरही बाजारात मिळते.
आगीमुळे शरीर भाजले असेल तर त्या ठिकाणी चंदनाला तुपात मिसळून लावल्याने शरीराची दाह कमी होण्यास मदत होते व जखम लवकर भरते.
चंदन व मध मिसळून डोळ्यांच्या खाली लावल्यास काळे डाग दूर होतात.
कोरड्या त्वचेला चंदनाच्या तेलाने मॉलिश केल्याने त्वचा नितळ बनते.
उन्हाळ्यात होणार्या घामोळ्यांवर चंदनाचा लेप लावल्याने घामोळ्या लवकर बर्या होतात.
