गाजर एक औषधी...
|
गाजरामध्ये असलेले गुण-
* कच्चे गाजर खाणे नेहमी फायदेशीर असते. गाजरामध्ये असलेल्या पिवळा भाग खाऊ नये, कारण ते अधिक उष्ण असल्याने ऍसिडिटीचा त्रास उद्भव असतो.
* गाजर हृदयरोगावर अधिक लाभदायी असून रक्त शुद्ध करणे, वातदोषनाशक, पुष्टिवर्द्धक तसेच मेंदू व आतडे यांच्या दृष्टीने बलवर्धक आहे. मूळव्याध, पोटाचे विकार, मूतखडा आदी आजारांवर औषधी आहे.
* गाजर गर्भवती महिलांसाठी गरम पडण्याची शक्यता असल्याने त्यांनी गाजर सेवन करू नये.
* गाजरामध्ये कॅल्शियम व केरोटीन हे मुबलक प्रमाणात असल्याने लहान मुलांसाठी उत्तम आहार आहे. मुलांच्या पोटातील जंत नष्ट करण्यासाठी गाजर औषधी आहे.
* गाजरामध्ये विटामीन 'ए' मुबलक प्रमाणात असल्याने नेत्र रोगावर लाभदायक आहे.
* गाजरामध्ये रक्त शुद्ध करण्याचे गुण असतो. 10-15 दिवसात गाजरचा रस प्यायल्याने रक्तविकार, गाठी, सूज व त्वचेसंदर्भात आजार बरे होतात. गाजर चावून चावून खाल्ल्याने दात व हिरड्या तंदरुस्त व स्वच्छ होतात.
* दररोज गाजरचा रस प्यायल्याने दृष्टी प्रखर होत असते.
* गाजरचा कीस करून त्यात चवीनुसार मीठ टाकून खाल्ल्याने खाज तसेच त्वचेचे आजार दूर होतात.
* गाजरच्या रसामध्ये मीठ, कोथिंबीर, जिरं पूड, मिरे पूड व लिंबूचा रस टाकून प्यायल्याने पाचनक्रिकेसंदर्भात अडचणी दूर होतात.
* भाजलेले गाजर हृदय विकारावर लाभदायी आहे.
* उन्हाळ्यात गाजराचा मुरंबा स्मरणशक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरतो.
