Last Modified: मंगळवार, 21 एप्रिल 2015 (15:25 IST)
घरगुती उपाय
* एक मध्यम आकाराचा कांदा कुस्करून 25 ग्रॅम पाण्यात उकळवा. पाणी अर्धे उरल्यानंतर गाळून प्यावे. दोन दिवस हा प्रयोग केल्यास लघवीची जळजळ थांबते.
* एक चमचा मेथीच्या दाण्याचे चूर्ण सकाळ, संध्याकाळ रिकाम्या पोटी घेतल्यास आठवड्याभरात उच्च रक्तदाब कमी होतो.
* दोन ग्रॅम कडूलिंबाच्या पाल्याची राख पाण्याबरोबर नियमित घेतल्याने मूतखडा विरघळून बाहेर पडतो.
कफयुक्त खोखला असेल तर फक्त आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. तसेच आवळा चावून खाल्ल्यानंतरही फक बाहेर पडतो.
* उष्माघात झालेल्या व्यक्तीला थंड आणि सावलीच्या ठिकाणी झोपवून डोक्यावर बर्फाची थंड पट्टी ठेवावी. कपडा भिजवून थंड पाण्याने शरीर पुसावे. पायाच्या तळव्यांना कांद्याचा रस चोळावा. कैरीचे पन्हे पाजावे.
* गाजराच्या रसाचे चार-पाच थेंब दोन्ही नाकपुडीत सोडल्याने दमा व उचकीमध्ये चांगला गुण येतो. जास्त गाजर खाल्ल्याने पोटात दुखत असेल तर गूळ खावा.