मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. आयपीएल लेख
Written By वेबदुनिया|

दुनिया अंबानींच्या मुठीत

ND
जगातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींमध्ये मुकेश धीरूभाई अंबानी यांचा समावेश होतो. त्यांची रिलायन्स इंडस्ट्रीज आज भारतीय उद्योग जगतात एक आघाडीची कंपनी समजली जाते. दिवंगत धीरुभाई अंबानी यांनी रिलायन्सची उभारणी केली आणि मुकेश यांनी तिची कीर्ति कळसास नेऊन पोहोचवली आहे. या कंपनीने विविध क्षेत्रांत आपले पाय रोवले आहेत. त्या सर्व क्षेत्रात ती आघाडीवर आहे, हे विशेष. रिलायन्सशिवाय भारतीय उद्योग जगताचा विचार होऊ शकत नाही, यातच सर्व काही आले.

मुकेश यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी झाला. वडिलांनी केलेले व्यावसायिक संस्कार त्यांच्यातही भिनले नसते तरच नवल. असे असले तरी त्यांनी शिक्षणाकडे तितकेच लक्ष दिले. त्यांनी अमेरिकेतून केमिकल इंजिनियरींगची पदवी संपादन केली. तसेच स्ट्रॅटफोर्ड युनिर्व्हसिटीतून व्यवस्थापनाची पदवीही मिळवली. शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वडिलांना व्यवसायात सहाय्य करायला सुरवात केली.

त्यांच्या येण्याने धीरूभाईंनी सुरू केलेल्या या कंपनीची ताकद वृद्धिंगत झाली. वडिलांच्या पाजलेल्या व्यवसायाच्या बाळकडूमुळे त्यांच्या निधनानंतरही मुकेश यांनी व्यवसायाची प्रगती आणखी जोमाने केली. म्हणूनच त्यांची कंपनी भारतातील सर्वात मोठी कंपनी समजली जाते. त्यांच्या कंपनीत त्यांचे 48 टक्यांचे शेअर्स असून त्यांची आज घडीला किंमत 49 दशलक्ष डॉलर्स आहे. सध्या मुकेश रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. गेल्या महिन्यात ते जगातील सर्वांत श्रीमंत 'सीईओ' बनले. त्यांचे उत्पन्न 304.6 दशलक्ष डॉलर्स आहे. नीता अंबानी (पूर्वाश्रमीच्या नीता सिंग) या त्यांच्या पत्नी आहे. या दाम्पत्याला आकाश आणि अनंत ही दोन मुले आहेत.