गायत्री मंत्राचा अर्थ.....
गायत्री मंत्राचा अर्थ काय आहे हे हजारवेळा तो जपणाऱ्यांनाही माहीत नसावे.
गायत्री हा खरंतर मंत्रच नाही. गायत्री हा एक छंद आहे. गायत्री ही कुणी देवता नव्हेच. आणि ही निव्वळ एक अत्यंत बुद्धीनिष्ठ घोषणा आहे जिचा शब्दश: अर्थ असा आहे :
लोकहो चला आपण सर्व मिळून एकोप्याने सूर्यासारख्या तेजस्वी दैवी बुद्धीमत्तेने प्रेरित होऊन सूर्याइतके अत्युच्च, महान ध्येय साध्य करण्यासाठी एकत्रितपणे प्रयास करूया.
बस्स, एवढंच!
सर्वसमावेशक उन्नतीसाठी सर्वांनी (यामधे घराणं,गांव, जात, धर्म, वंश, वर्ण, लिंग, प्रांत, देश... असा कोणताही भेदभाव केलेला नाही. न: म्हणजे सर्व. सर्व म्हणजे सर्व!!!) एकदिलाने प्रयास करण्याचे हे आवाहन आहे.
अर्थातच याचा अर्थ समजून तो पूर्णपणे आचरणात आणल्यास सर्वांचच भलं होईल यात शंकाच नाही. पण निव्वळ एक धार्मिक मंत्र म्हणून रेकॉर्डप्लेयरवर रात्रंदिवस पुन्हापुन्हा निरर्थकपणे वाजवत राहून कुणाचंही भाग्य उजळणार नाही.