1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 मे 2024 (15:44 IST)

सर्वानी झाडे लावा नाही तर ही नवीन कविता पाठ्यपुस्तकात येईल ..

झुक झुक झुक झुक आगीनगाडी
पाण्याचे डबे आणून सोडी
वाळकी झाडे पाहू या
मामाच्या गावाला जाऊ या
 
मामाचा गाव मोठा
पाण्याचा लय तोटा
हंडा रांगेत लावू या
मामाच्या गावाला जाऊ या
 
मामाची बायको सुगरण
पाण्यासाठी फिरते वणवण
बिनआंघोळीचे राहू या
मामाच्या गावाला जाऊ या
 
मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठून आलीत ही कार्टी
पाण्यासाठी भांडू या
मामाच्या गावाला जाऊ या
 
मामा मोठा तालेवार
आंघोळीच्या गोळ्या आणल्यात चार
कोरड्या पाण्याने न्हाऊ या
मामाच्या गावाला जाऊ या
 
झाडे लावा, झाडे जगवा
 
हसा !! पण ह्या परिस्थितीचा नक्की विचार करा