गुरूवार, 6 नोव्हेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (09:47 IST)

ही फास्ट ट्रेन आहे, मुलुंडला थांबत नाही

Marathi jokes
तो बाहेरून प्रथमच मुंबईत आला असावा कारण तो विचारु लागला "मुलुंड कधी येईल मला उत्तरायचंय." 
लोकांनी सांगितलं की "ही फास्ट गाडी आहे ही मुलुंडला थांबत नाही". बिचारा घाबरला. 
लोकांनी सांगितलं की "घाबरू नको एक कर, ही गाडी मुलुंडला स्लो होते तेंव्हा तू धावत्या गाडीतून उतर. व गाडी ज्या दिशेला जाते त्या दिशेला थोडा धाव म्हणजे तू पडणार नाहीस". 
झालं, ठरल्या प्रमाणे त्याला दारात उभं केलं, गाडी मुलुंड ला स्लो झाली तेंव्हा तो स्टेशन वर उतरला आणि ठरल्याप्रमाणे धावला, पण तो इतका जोरात धावला की पुढच्या डब्याजवळ गेला.
तिथल्या लोकांनी त्याला धरून आत घेतला व सांगितलं, "तुझं नशीब चांगलं म्हणून तुला ही गाडी मिळाली, ही फास्ट ट्रेन आहे. मुलुंडला थांबत नाही."