Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोरपिसे मनातली...

Updated: सोमवार, 5 मार्च 2018 (11:07 IST)
उशीर झाल्यावर आपली पण वाट पाहणारे कोणीतरी असते याची किंमत मला मी 'आई' झाल्यावर कळली.
आज का कोण जाणे आईची खूप आठवण आली दिवा लावताना...
 ये ग जरा वेळ काढून. अधूनमधून यावं मुली ने माहेर पणाला . मी गेल्यावर किंमत कळेल बघ माहेरपणाची. असे नेहमी म्हणायची. कसे तरीच वाटायचे मनाला . आज आई नाही, तिची मायेची हाक नाही. आज माझ्या 'सासरी' गेलेल्या मुलीची  वाट पाहताना जाणवते माझ्या आईचे लेकीच्या भेटीसाठी तळमळणारे हृदय.  
तीच आठवली दिवेलगणी ला. तिचे चेहऱ्यावरचे  करुण पण स्निग्ध भाव. तेच भाव अजूनही एखाद्या मोरपिसासारखे मनाच्या कप्प्यात जपून ठेवले आहेत मी. माझी देवावर श्रद्धा होती पण आई इतकी नव्हती. कधीतरी असे घडले की  मी मनापासून देवापुढे हात जोडले माझ्या मुलींसाठी.
मग कळले आई होणे म्हणजे काय असते..
आपसूकच तिन्हीसांजेला दिवा लावू लागले न विसरता .पण आज ही दिवा लावताना आठवते माझे माहेर. आई चे मनाचे श्लोक , तिची कारुण्याने भरलेल्या स्वरातली करुणाष्टके ,   त्यातच मिसळलेला कुकर च्या शिट्टी चा आवाज , उदबत्ती च्या घमघामाटा बरोबरच  आंबेमोहोर तांदळा चा भात आणि हळद हिंग घालून शिजवलेल्या वरणाचा तोंडाला पाणी सुटणारा वास,
गरम गरम पोळ्यां आणि टॉमेटो च्या कोशिंबीरी चा थाट . तिन्ही सांज म्हणजे डोक्यात पक्का बसलेला हा त्रिवेणी संगम
माझी साधी सोपी 'माहेरा' ची व्याख्या.
खरंच माहेरवाशिणी ...जर माझे मनोगत वाचत असतील तर नक्की भेटून या आपल्या आई ला. एखादा फोन तरी कराच. आई मला म्हणायची तू पक्की आई झालीयस . मुलींशिवाय दुसरे काही तुला सुचतच नाही.मुली ची आई होणं सोपं नाही ग बाई!!  आधी तिची मैत्रीण हो मग तुझी लेक तुझं 'आईपण' सहज स्वीकारेल. 
हो आई .. मी प्रयत्न करतेय. पण अजून ही दिवा लावताना देवी च्या जागी तूच दिसतेस ज्या दिवशी माझ्या मुलींना 'देवीच्या' जागी 'मी' दिसेन ना आई , त्या दिवशी मी समजेन की मीही  तुझ्यासारखे मातृत्व निभावले. 
मंजू काणे

सर्व पहा

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

सर्व पहा

हरियाणवी गायक अंकित बालियानची गोळ्या झाडून हत्या; जिमबाहेर ४ हल्लेखोरांनी झाडल्या २० गोळ्या

जेव्हा नेहा धुपियाने करण जोहरला तीन वेळा लग्नाची मागणी घातली, पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर मिळालं

Princess of Hill Stations "टेकड्यांची राणी" कोडाईकनाल तामिळनाडू

उर्वशी रौतेलाच्या तिरंगी गाऊन वरून वाद निर्माण, अभिनेत्रीने दिले स्पष्टीकरण

बिकिनीमध्ये रक्षाबंधन! वाद निर्माण झाल्यानंतर कृती सेननची जाहिरात मागे

पुढील लेख
Show comments