Festival Posters
✕

आधुनिक मूर्खलक्षणे

Updated: गुरूवार, 6 सप्टेंबर 2018 (12:56 IST)
अभ्यास व्यायाम ना करी 
रात्रंदिन फोन ज्याचे करी
तो एक मूर्ख ||
 
जिथे तिथे सेल्फी काढतो 
श्र्लील अश्लील भेद न करतो 
आलेला संदेश ढकलतो 
तो एक मूर्ख ||
 
घरुन जाता बाजारी 
कापडी थैली ठेवी घरी 
पॉलिथिनची हाव धरी 
तो एक मूर्ख ||
 
जाता स्वरुचीभोजनी
अन्न घेई भरभरोनी
थोडे खाऊन देई टाकोनी
तो एक मूर्ख ||
 
वाहतूकीचे नियम न पाळणे 
रस्त्यावरी कचरा टाकणे 
ऐसी ज्याची अवलक्षणे 
तो एक मूर्ख ||
 
दिली वेळ न पाळतो 
लोकांचा खोळंबा करतो 
खंतखेदही ना मानतो 
तो एक मूर्ख ||
 
ऐसी मूर्खलक्षणे असती
जी समर्थ समयी नसती
विनायके वर्णिली असती 
त्यागार्थ यथामती ||

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाला लॉरेन्स गँगच्या नावाने एक धमकीचा ऑडिओ संदेश

ट्रेनमध्ये गाणारा 'हनुमान अंश' मधील नेत्रहीन गायक आता जग पाहू शकणार! उपचार सुरू

सलमान खानचे 'मातृभूमी'मधील 'तेरी सेक्सी ब्युटी' हे नवीन गाणे प्रदर्शित

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकला जाणार? प्रवासापूर्वी कोणत्या गोष्टी तपासाव्यात?

पुढील लेख