सोमवार, 29 डिसेंबर 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

खोडकर मुलासारखे.....मन गुपचुप बसून राहते...

whatsapp message
काय करावं ह्या मनाचं काही कळत नाहीं...
वया सोबतं रहायला याला जमतंच नाही..
 
चाळीशी पर्यंत कसं सोबत असायचं...
आता मात्र सोबत यायला कुरकुर करतं...
 
शरीर वाढत्या वयाला  साथ द्यायला  लागतं..
मन मात्र मोठं व्हायला कायम नाराज असतं...
 
प्रौढत्वाच्या खुणा येऊन अंगभर  विसावतात..
मन मात्र डोळ्यातून मिश्कील हसतं असतं...
 
शरीराचं आणि मनाचं नातं  कधीतरी तुटतं ...
शरीर भविष्याकडे....मन भूतकाळाकडे धावतं.
 
बुध्दीच मग कित्येकदा मनाला खेचून आणतें...
मन देखील सोबत असल्याचे मस्त नाटक करतें..
 
खोडकर मुलासारखे.....मन गुपचुप  बसून राहते...
आणि .....वयाचा डोळा चुकवून,  परत निसटून जातें...!!!