शनिवार, 18 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

अभ‍िप्राय

अभिप्राय जोक्स विनोद
महिला मंडळाचा कवियत्री मेळावा होता. प्रत्येक कवियत्री आपापल्या परीने भिकार कविता सादर करत होती. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द कवी उपस्थित होते. प्रत्येक कविता सादर करून झाली की़ ते मोठ्यांदा 'नाईस पोएम' म्हणायचे.

कार्यक्रमानंतर बरोबर आलेल्या मित्राने मराठी कवितेवर इंग्लिशमध्ये अभिप्राय का देत होता. असे विचारले असता ते म्हणाले, 'खोटं बोलायचं असलं, की मी इंग्लिशमधून बोलतो'.