एका प्रख्यात डॉक्टरांकडे एक तरणाबांड आणि धडधाकट तरुण भलामोठा गुच्छ आणि भेटवस्तू घेऊन आला. 'तुमच्या औषधोपचारामुळे माझे कल्याण झाले'. असे म्हणत त्याने गुच्छ व भेट वस्तू डॉक्टरांकडे दिली.
'पण तुम्ही माझ्याकडे औषधासाठी येत असल्याचे मला आठवत नाही'. डॉ. गोंधळलेले म्हणाले.
'मी नव्हतोच, पण माझे श्रीमंत निपुत्रिक काका तुमचे औषध घेत होते. तुमच्या हातगुणामुळेच मी श्रीमंत झालो'. तरुणाने खुलासा केला.