1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
  6. किती दिवस असा चोरुन खाणार आहेस ?

Jokes in Marathi - get Good Collection of Marathi Vinod | किती दिवस असा चोरुन खाणार आहेस ?

WD
एकदा एक पैलवान नोकरी करण्यासाठी शहरात येतो, पण
शिकलेला नसल्यामुळे त्याला कोणीच नोकरी देत नाही.
त्यामुळे त्याचे जेवणाचे वांदे होतात. तेव्हा रस्त्यात
त्याला एक केळेवाला दिसतो. पैलवान लगेच त्याला बद्डून
३-४ डझन केळी घेउन खायला लागतो. त्याचवेळी तिथून
प्राणिसंग्रहालयाचा मालक जात असतो.
तो पैलवानाला बाजुला घेउन विचारतो
“अरे, किती दिवस असा चोरुन खाणार आहेस ? माझ्याकडे
काम कर, दिवसाचे १००रुपये आणी पाहिजे तेवढे जेवण
मिळेल.
मग पैलवान त्याच्याबरोबर zoo मध्ये जातो, तिथे
त्याला एक गोरिलाची कातडी मिळते जी त्याला ,
दिवसभर पांघरुन रहायचई असते.
असाच एका दिवशी,तो पिंजर्‍याला टेकुन उभा,
राहिला असताना, पिंजर्‍याची भिंत तुटते
आणी तो सिंहाच्या पिंजर्‍यात जाउन पडतो.
त्याबरोबर, तो “वाचवा, वाचवा ” ओरडत पळू लागतो,
सिंह त्याच्या जवळ आलेला असतो,तो
गोरिलाच्या तोंडावर हात ठेवुन म्हणतो
“गप्प बैस, नाहितर दोघांचीही नोकरी जाईल !
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा