गोपाळराव : अहो वहिनी हे काय, तुमचा चेहरा इतका कशाने सुजला आहे? वहिनी : चोराने मारले. गोपाळराव : अहो मग दागिने घालून कशाला फिरता. फार तर खोटे दागिने घालायचे. म्हणजे धास्ती नाही. वहिनी : तसेच केले होते. परवा खोटे दागिने चोरीला गेले आणि काल तोच चोर आला आणि खोटे दागिने घालता लाज नाही वाटत? असे म्हणून सणसणीत थोबाडीत दिल्या.