शुक्रवार, 24 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

घराचा शोध

घराचा शोध
ND
एकदा मध्यरात्रीच्या सुमारास एक मद्यपी आपल्याच घराचा शोध घेत इकडे तिकडे फिरत होता. परंतु त्याला काही केल्या घरचा रस्ता सापडत नव्हता, होताकरता पहाट झाली, आणि तो स्वत:शीच बडबडत एका चौफुलीजवळ आला, त्यावेळी पाणी पुरवठा खात्याचा पाणी सोडणारा एक कर्मचारी नळाच्या पाण्याचा व्हॉल्व आपल्या भल्या मोठ्या लोखंडी चावीने फिरवीत असतांना त्याला दिसला. त्यावर हा मद्यपी त्याच्या अंगावर खेकसला.
'सा.....ला... तूच रस्ता या चावीने फिरवीतो आहेस म्हणून मला माझे घर सापडत नाही.'