चिंतोपंतांचे बायकोशी कडाक्याचे भांडण झाल्याने घरात अबोला होता. अत्यावश्यक गोष्टींबाबत चिठ्ठ्यांची देवाणघेवाण होई. एकदा त्यांना पहाटे गावाला जायचे असल्याने त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली, मला साडेचारला उठव. सकाळी उठून पाहतात तो साडेसात वाजलेले होते. संतापून ते बायकोला ओरडणार, तेवढ्यात बायकोने बोट दाखवून पलंगावर चिठ्ठी होती, साडेचार बाजले उठा.