एका शाळेत वैद्यकीय तपासणी होती. डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची, उंची छाती, पोट, कंबर, पाय वैगेरे तपासल्यावर त्यांना आपापल्या वर्गात जाण्याचा सांगण्यात आले. तरीही एक मुलगा तेथेच उभा होता. डॉक्टरांनी त्याला जवळ बोलावून विचारले. 'बाळ, तुला काही शंका आहे का?' मुलगा म्हणाला, 'आम्हाला कपडे कधी शिवून देणार?'