खेडेकर, बेडेकर आणि येडेकर हे तिघे जुने कॉलेजपासूनचे मित्र होते. तिघंही संसाराला लागले होते. बेडेकर पुण्यात राहत होता. खेडेकरही पुण्याजवळच राहत होता. कोल्हापुरहून आलेल्या येडेकरानं खेडेकर पुण्यात कुठं राहतो असे विचारले असता. बेडेकर म्हणाला, 'अरे अगदी जवळ आहे. खेडेकराच्या घराला आग लागली तर आमच्या घरातून सहज दिसू शकेल.'