एक महिलेने एका चित्रकाराकडून स्वत:चं एक सुंदर पोट्रेट बनवून घेतलं. मात्र त्या पोट्रेटमध्ये ती मौल्यवान दागिन्यांची नखाशिखांत सजलेली दाखवण्यात आली होती. तिच्या एका खास मैत्रिणीने विचारलं, ''तू तर कधी इतके दागिने घातले नाहीस, मग या चित्रात मात्र एवढे दागिने का?'' ''कारण माझ्या मृत्यूनंतर माझ्या पतीने जर दुसरं लग्न केलं, तर माझं हे चित्र पाहून माझी ती सवत दागिन्यांसाठी माझ्या पतीचं जगणं असह्य करून टाकेल, महिला हसत म्हणाली.