फिरता विक्रेता मे मतिहन्यात एका लहान गावातल्या सामान्य हॉटेलात गेला होता. बर्फ घालून पाणी मागितल्यावर वेटरने बर्फ घालून पाणी दिले. थंडगार पाणी पिऊन तो खुष झाला. दुसर्या दिवशीही बर्फ घातलेले पाणी पीत असताना तो वेटरला म्हणाला, 'कालचं बर्फाचं पाणी अधिक थंड होतं, हे तेवढं थंड नाही' 'त्याचं काय आहे,' वेटर म्हणाला, कालचा बर्फ थंड पाण्यापासून केला होता आणि आजचा बर्फ हा गरम पाण्यापासून केला आहे, म्हणून पाणी कमी थंड आहे.