रविवार, 12 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

भावाला पत्र

मराठी जोक्स
एक अडाणी माणूस पेन्सिलिनं कागदावर नुसत्याच रेघोट्या ओढत असल्याचे पाहून एका गृहस्थानं त्याला विचारलं, "काय रे! हे काय करतोस?"
अडाणी मनुष्य - गावी राहणार्‍या मोठ्या भावाला मी पत्र लिहितोय.
दुसरा गृहस्थ - पण तू तर कागदावर नुसत्या रेघोट्या ओढतो आहेस. त्या तुझ्या भावाला कशा वाचता येणार? तुला लिहिता येत नाही का?
अडाणी मनुष्य - मला तर लिहिता वाचता येत नाहीच, पण माझ्या भावाला तरी कुठं लिहिता वाचता येतंय?