भाषण
|
बायको - खरंच आज तुम्ही फारच दमल्यासारखे दिसता, काय झालं तरी काय?
वकील - तीन दिवस झाले आरोपीतर्फे मी एकसारखा बोलतोय, काहीही झालं तरी उद्या आणि परवाही माझं भाषण सुरूच ठेवावं लागेल.
बायको - पण लांबलचक भाषण कशासाठी करताय? जे सांगायचं ते थोडक्यात नाही का सांगता येणार?
वकील - छे गं... तुला कळत नाही. माझ्या अशिलाविरूद्ध न्यायाधीशापुढे भरभक्कम पुरावा आलाय आणि तो ते सर्व विसरून जाईपर्यंत मला माझं भाषण अजिबात पुरं करता यायचं नाही.
