मराठी विनोद : डॉक्टर नर्स
WD
'' सरलाताई तुमच्या पोराला जरा संभाळा... मी आत्ता थोड्या वेळापुर्वी त्याला माझी पोरगी पिंकीसोबत डॉक्टर आणि नर्स खेळतांना पकडलं आहे ''
सनीची आई पिंकीच्या आईला समजावण्याचा प्रयत्न करीत म्हणाली , '' कमलाताई .. एवढं वाईट वाटून घेवू नका ... या वयात पोरांमधे थोडं आकर्षण असनं नैसर्गीक आहे ''
'' आकर्षण ? ... बरं झालं मी वेळेवर पोहोचली ... नाही तर हा तुमचा मुलगा चाकुने पोट कापून माझ्या पोरीचं अपेडीक्स बाहर काढणार होता. ''
