बंता घरी आला. त्यानं पाहिलं की त्याचा सगळ्यात चांगला म्हणवणारा मित्र नाथा आपली पत्नी बंतो हिचं चुंबन घेतो आहे. ते पाहून त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. संतापाच्या तिरीमिरीत त्यानं पिस्तूल काढलं आणि नाथाच्या डोक्यात थेट रिकामं केलं. बंतो आपल्या पतीला काळजीच्या सुरात म्हणते,‘‘ बंताजी! स्वत:च्या रागावर नियंत्रण ठेवायला शिका जरा. अन्यथा असं करून तुम्ही तुमचे सगळे जवळचे मित्र गमावून बसाल.’