मंगळवार, 14 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

लाडू

लाडू
दिवाणखान्यात स्वेटर विणत बसलेल्या आपल्या आईपाशी जाऊन मन्यानं तिला लडिवाळपणे विचारलं, "आई गं, स्वयंपाकघरातील फडताळातल्या डब्यातला एक लाडू खाऊ का मी?"
"खा बरं बाळ. भूक लागलीय का तुला?"
आईचे हे शब्द कानी पडताच मन्या म्हणाला, "आई! तू लाडू खायला परवानगी दिलीस, म्हणून मला किती बरं वाटलं! कारण तो लाडू मी अगोदरच खाऊन टाकला होता!"