शहरातील वेड्यांच्या रुग्णालयाला एक राजकीय नेता भेट देतो. त्याच्या भेटीसाठी रुग्णालय व्यवस्थापन सर्व वेड्यांना रांगेत उभे करतात. रांगेतील शेवटचा वेडा त्याच्याशी हस्तांदोलन करतो आणि विचारतो, तुम्ही कोण आहात? नेता उत्तरतो, मी आपल्या भागाचा खासदार आहे. ते ऐकून वेडा म्हणतो, मीसुद्धा जेव्हा इथे आलो होतो तेव्हा माझेही उत्तर हेच होते. होईल...होईल हळूहळू सूधारणा होईल.