गणपती म्हणून सुपारीची पूजा का करतात ?
WD
पूजेच्या वेळी तांदळाच्या राशीवर सुपारीची प्रतिष्ठापना केली जाते. त्या सुपारीला ध्यान, आवाहन, आसन अर्घ्य, पंचामृत स्नान, गंधोदक स्नान, सुमंगलस्नान, पुष्पस्नान, हिरण्यस्नान, शुद्धोदक स्नान या पद्धतीने त्या सुपारीवर उपचार करून, सुपारीची प्रतिष्ठापना केली जाते.
तसेच मंत्रोच्चाराने त्या देवतेला बोलावले जाते. त्या आराधनेच्या बळावर त्या पूजेत आपला लाडका बाप्पा सुपारीच्या रूपात तिथे हजेरी लावतो

