1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
  4. Worshiping Shri Dattaguru on Thursday

आयुष्यातील दुःख, संकट आणि दोष दूर होण्यासाठी गुरुवारी करावी श्री दत्तगुरूंची आराधना

गुरुवार हा श्री दत्तगुरूंच्या (श्रीगुरुदेव दत्त) उपासानेसाठी अत्यंत पवित्र आणि फलदायी मानला जातो. दत्तगुरूंच्या कृपेने साधकाच्या आयुष्यातील दुःख, संकट आणि दोष दूर होऊन सुख, शांती आणि समृद्धी लाभते. तसेच गुरुवारी श्री दत्तगुरूंची आराधना कशी करावी, याची सविस्तर पूजा पद्धत आणि नियम जाणून घ्या.....

गुरुवारी दत्त पूजेची सोपी पद्धत
सकाळची तयारी: गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे. या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते.

पूजा स्थान स्वच्छ करणे: देवाऱ्यातील किंवा पूजेच्या पाटावरील श्री दत्तगुरु/स्वामी समर्थांची मूर्ती किंवा प्रतिमेला स्वच्छ करा.

अभिषेक व विधी: मूर्ती असल्यास शुद्ध पाणी व कच्च्या दुधाने अभिषेक करावा. प्रतिमेला चंदन, अष्टगंध, हळद-कुंकू लावावे.

पिवळी फुले व तुळस: दत्तगुरूंना पिवळी फुले (उदा. झेंडू किंवा शेवंती) आणि तुळशीपत्र अर्पण करा. (दत्तगुरूंना तुळस अतिशय प्रिय आहे).

धूप-दीप: तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि धूप/अगरबत्ती दाखवावी.

नैवेद्य: दत्तगुरूंना पेढे, खडीसाखर, गूळ-खोबरे, केळी किंवा दुधाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा.

पठण करायचे स्तोत्र व मंत्र
पूजा करताना किंवा पूजेनंतर खालील मंत्र आणि स्तोत्रांचे पठण करावे:

मूल मंत्र:
"ॐ दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्॥"

नामजप (किमान १०८ वेळा):
"श्री गुरुदेव दत्त"
"दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा"

स्तोत्र पठण:
श्री गुरुचरित्र अध्याय वाचन (किमान १ किंवा १४ वा अध्याय).
'घोरकष्टोद्धरण स्तोत्र' (श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज रचित).
पूजेचे काही विशेष नियम व उपाय
भिक्षा/दान: गुरुवारी गरजूंना किंवा अन्नछत्रात अन्नदान करणे, गाईला गूळ-पोळी खायला देणे खूप पुण्यकारक मानले जाते.
उपवास: ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुवारी एकभुक्त (एक वेळ जेवून) उपवास करावा.
दत्त मंदिर दर्शन: शक्य असल्यास संध्याकाळी जवळच्या दत्त मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे आणि आरतीत सहभागी व्हावे.
पुढील लेख
Bhaubij 2026 विशेष भावासाठी बनवा झटपट रोझ कोकोनट बर्फी