1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2013
  6. 2013 मधील 12 राश्यांचे भविष्य

2013 मधील 12 राश्यांचे भविष्य

नवीन वर्ष 2013मध्ये ग्रह-नक्षत्र बदलत आहे. बरेच ग्रह आपली जागा सोडून दुसर्‍या घरात प्रवेश करणार आहे. अशा वेळेस ग्रहांचे चढ-उतर निश्चित आहे. मग आता आपण जाणून घेऊ की नवीन वर्ष तुमच्यासाठी कसे राहील, हे तुम्हाला यश देणारे आहे की नाही. वाचा 2013चे वार्षिक भविष्यफल....।

मेष राशी : भौतिक सुख-समृद्धी मिळेल

WD


2013 हे साल तुम्हाला सांगते आहे की, प्रेम, आरोग्य, कुटुंब, व्यवसाय, पैसे आणि शिक्षण यासंबंधीचे निर्णय सावधपणे घ्या, अन्यथा कालांतराने तुम्हाला दोषांना तोंड द्यावे लागेल. धनप्राप्तीसाठी नोव्हेंबर, एप्रिल, जुलै, सप्टेंबर हे महिने विशेष अनुकूल आहेत.

या वर्षी वर्षभर गुरुकृपा असल्याने धनाची चिंता करावी लागणार नाही. तुम्ही 2013 मध्ये खूप खंबीर बनणार आहात आणि प्रेम तसेच कुटुंबासंबंधी गंभीर परिस्थितीशी मुकाबला करता येईल पण त्यातून बराच फायदा होणार नाही. त्यामुळे शक्य होईल तितके स्वत:ला शांत ठेवा.

तुमच्या तापट स्वभावामुळे नुकसान होणार नही व शत्रुत्व वाढणार नाही, याची विशेष काळजी वर्षभर घ्यावी लागेल. परदेशगमन व परदेश व्यवहाराच्या कामांना जुलै ते सप्टेंबरमध्ये चालना मिळेल. मुलांच्या शैक्षणिक अभ्यासाला जानेवारी ते मे 2013 हा कालावधी अनुकूल आहे.

पुढील पानावर वाचा वृषभ राशी...


वृषभ राशि : कुटुंब, प्रेम आणि व्यवसायविषयी समाधानकारक

WD


वृषभ राशीच्या लोकांसाठी 2013 हे वर्ष उत्तम असणार आहे. या वर्षी हे लोक ज्याची सुरुवात करतील त्यात यश मिळवतील. या वर्षात आध्यात्मिक जीवनाकडे तुमचे लक्ष जाईल. व्यवसायात उत्तम प्रगती होईल. मार्च ते जून 13मध्ये काही बदल घडण्याचे प्रसंग येतील. तरी गुरुकृपेने त्यातून पार पडाल. महत्त्वाची कामे नवीन वर्षारंभी सुरू करून त्यात बरीच मजल माराल. यशाची मजा पुढच्या वर्षात चाखता येईल.

आर्थिक बाबतीत फार अपेक्षा न बाळगणे बरे. कुटुंब, प्रेम आणि व्यवसायविषयी 2013 हे वर्ष समाधान देणारे असणार आहे. पण तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जोवर तुमच्या आरोग्याचा प्रश्न आहे, तुम्ही जोखीम घेऊन चालणार नाही. तुमच्या कार्यालयीन ठिकाणी काही समस्यांचा सामना करावा लागेल. पण अशा समस्यांवर तुमची हुशारी आणि प्रामुख्याने तुमची मेहनत उपाय शोधून काढेल.

तुम्ही सर्वांप्रती दयाळू असणार आहात आणि तुमचा हाच स्वभाव आयुष्यात पुढे जाण्यासाठी उपयोगी ठरेल. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित निकाल मिळतील आणि त्यामुळे ते स्पर्धात्मक परीक्षेला प्रवेश घेतील.तरुणांचे विवाह नवीन वर्षात ठरतील व पार पडतील.

पुढील पानावर मिथुन र‍ास....


मिथुन राशि : संतान सुख प्राप्त होईल

WD


नवीन वर्षात महत्त्वाचे सर्वच ग्रह तुम्हाला मर्म शोधून काढणे आवडते. नवीन वर्षात महत्त्वाचे सर्वच ग्रह तुम्हाला साथद्यायला राजी असल्याने चिंता करण्याचे कारण नाही पण तुमचे विचार तुमच्या जिवलगांना आणि कुटुंबाला नकारात्मक वाटू शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांसाठी सुरक्षाकवचाची गरज भासेल.

ज्या व्यक्तींवर तुमचा संपूर्ण विश्वास आहे, त्याच व्यक्तींना वेळ द्या. एप्रिल-मे मध्ये अनपेक्षित कारणांमुळे नवीन खर्च उभे राहतील. जूननंतर गुरु़ मंगळ अनुकूल राहिल्याने भरपूर कामे करून आर्थिक तणाव कमी करी शकाल. नोकरीत कामाचा दबाव वाढेल. त्यामुळे थोडी अस्वस्थता व अशांतता लाभेल, मात्र नवीन वर्षात हे प्रमाण हळूहळू कमी होईल. एप्रिल ते जून या काळात नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कर्तव्यात कसूर होणार नाही याची काळजी घ्या.

व्यवसाय आणि पैशासंबंधी काही व्यवहार करण्याआधी प्रत्येक गोष्टीचे अवलोकन करून अंदाज घ्यावा. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर आधी संस्थेविषयी सगळी माहिती तपासा असा सल्ला आहे. तुम्ही एखाद्या कायदेशीर वादात अडकाल, सावध रहा. घरात कौटुंबिक जबाबदार्‍या मेपर्यंत वाढतील.

पुढील पानावर वाचा कर्क रास ...


कर्क राशि : व्यवसायात फायदा होईल

WD


हे वर्ष प्रेम, व्यवसाय आणि आर्थिक पातळीवर सकारात्मक ठरणार आहे. यापूर्वी जर तुम्हाला प्रेमाने हुलकावणी दिलीअसेल तर 2013 ला तुम्हाला प्रेम मिळेल. छोटी भांडणे आणि वाद टाळा. प्रेमाचा अदभूत प्रवास अनुभवा. कामाच्याताणामुळे संपूर्ण वर्ष थकवा जाणवेल. तुम्ही नवा व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला परदेशीव्यवसायातून फायदा होईल.

जोखीम घेणे टाळा. कारण त्यामुळे तोटा होऊ शकतो. नवीन वर्षात देणी निर्माण होणार नाहीत याकडे लक्ष द्या. जोडधंदा असणार्‍यांनी नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नोकरीत मार्च-एप्रिलपर्यंतचा काळअनुकूल राहील. जूननंतर मात्र नको त्या ठिकाणी मानविरुद्ध बदली होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षात स्वत:हून बदल न करणे हितावह राहील.

तुम्ही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्यासाठी तुम्हाला दोष देण्यात येईल. आणि मुख्य म्हणजे अगदीतुम्ही स्वत:ला दोष द्याल. उदार असणे चांगले आहे, पण तुम्ही परिस्थितीची गडद बाजू बघणे योग्य ठरेल. विद्यार्थ्यांनीअपेक्षित कोर्सला प्रवेश मिळवण्यासाठी तडजोडीची तयारी ठेवावी.

पुढील पानावर वाचा सिंह रास...


सिंह राशि : नवीन वर्ष मानसिक शांती देणारे असेल

WD


2013 हे वर्ष गुंतवणुकीच्या बाबतीत उत्तम आहे. या राशीच्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि उच्च शिक्षणाचे ध्येयठेवले पाहिजे. त्यांना नक्कीच फलदायी परिणाम मिळतील. यावर्षी तुमचे नातेसंबंध अधिक गहिरे होण्याची शक्यता आहे. तुमचे कुटुंबासोबतचे नाते अधिक दृढ होतील आणि घरात आनंद तसेच समाधानाचे वातावरण असेल.

सर्वात उत्तम भागम्हणजे 2013 हे वर्ष तुम्हाला मानसिक शांती देणारे असेल. कामानिमित्ताने कदाचित परदेशवारीही होईल. जानेवारीमध्ये खेळत्याभांडवलाची तरदूत करावी लागेल. नोकरीत येणारा काळ अनुकूल आहे. तुमच्या गुणांची कदर होईल. खासप्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल.

बेकार व्यक्तींना मे 2013 पर्यंत काम मिळेल. तरुणांचे विवाह ठरतील व पार पडतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यशप्राप्ती होईल. सामाजिक क्षेत्रातील लोकांना स्वत:च्या क्षेत्रात नाव कमवता येईल. हे साल तुमच्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे. तुम्ही ज्या गोष्टीला हात लावलं त्याचे सोने होईल आणि जरी हात लावला नाही तरी नक्कीच अन्य मार्गाने तुम्हाला फायदा संभवतो.

पुढील पानावर वाचा कन्या रास...


कन्या राशि : महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील

WD


2013 या वर्षी तुम्हाला कार्यालयीन ठिकाणी केल्येल्या कामाबद्दल आदर आणि सन्मान मिळेल. तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जात आहेत, याबाबत तुम्ही खूप सावध असणे गरजेचे आहे. तुमच्या व्यवसायानिमित्त त्वरित प्रवास करावा लागेल. सर्व महत्त्वाचे ग्रह गुरु, शनी व शुक्र अनुकूल आहेत. त्यामुळे तुमची महत्त्वाकांक्षा दिवसेंदिवस वाढत जाईल.

आर्थिक ऊब चांगली मिळेल. त्यामुळे येणारे वर्ष म्हणजे तुम्हाला संस्मरणीय ठरेल. धंदा-व्यवसायात यशाच्या नवीन सीमा गाठण्याचा तुमचा निर्धार बहुतांश प्रमाणात सफल होईल. तुम्ही या वर्षात कुटुंब, प्रेम आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी वेळ काढाल असे दिसते.

कदाचित तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एका दीर्घ सहलीचे आयोजन कराल, यामुळे तुमचे घरातल्यासोबत दृढ नातेसंबंध आणि प्रेम-जिव्हाळा निर्माण होईल. उच्चशिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्‍छिणार्‍यांना संधी मिळेल. सामूहिक कामाशी निगडित असार्‍या व्यक्तींना मेनंतर काळ जास्त अनुकूल राहील.

पुढील पानावर वाचा तूळ रास...

तूळ राशि : जोखीम घेण्याच्या दृष्टीने हा वेळ योग्य नाही

WD


2013 मध्ये परिस्थितीमुळे तुम्हाला काही प्रमाणात निराशा येईल.राशीतच शनीचे वास्तव्य वर्षभर राहणार आहे. त्यामुळे कासवाच्या गतीने यशाकडे वाटचाल राहील. अष्टमातील गरूची साथ जरी नसली, तरी जून 2013मध्ये तो भाग्यात आल्यावर उत्पन्नाचे प्रमाण वाढवेल.

हे वर्ष काही असमाधानकारक परिस्थितींमुळे हताश करेल. पण तुम्ही विश्वास गमावणे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही. तुमच्या करिअरविषयी काही नवीन सुरू करण्याआधी प्रत्येक मुद्दा नीट तपासणे आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घेणे हितावह ठरेल.

असमाधानामुळे जुन्या व्यवसायातील भागीदारी तुटण्याची शक्यता आहे. तुमचा पैसा हात राखून खर्च करा, अन्यथा त्यामुळे समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना तांत्रिक अडथळे पार करून उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेता येईल. राजकारणी व्यक्ती, खेळाडू, कलाकार लोकांना आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देऊन स्वत:ची प्रतिमा निर्माण करावी लागेल. जोखीम घेण्याच्या दृष्टीने ही वेळ नक्कीच चांगली किंवा योग्य नाही. तुमचा पैसा कुठेही गुंतवण्याआधी त्यातील बारीक तपशील तपासा. विद्यार्थी वर्गाने बरीच मेहनत घेणे आवश्यक आहे, तरच त्यांना अपेक्षित निकाल मिळू शकतील.

पुढील पानावर वाचा वृश्चिक रास....

वृश्चिक राशि : हे वर्ष संमिश्र स्वरुपाचे आहे