Free Astrology Horoscope, Vedic Astrology, Astrology Predictions, Daily Astro | आज (11 जानेवारी) तुमचा वाढदिवस आहे?
WD
तुम्ही मानसिकरूपेण स्वस्थ असता पण शारीरिक शिथिलता असते. चंद्र ग्रह स्त्री ग्रह असतो, म्हणून तुम्ही फारच भावुक स्वभावाचे असता. तुमच्यात जराही गर्व नसतो. चंद्राप्रमाणे तुमच्या स्वभावात चढ-उतार येत असतो. जर तुम्ही घाईगडबड सोडली तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल.
शुभ दिनांक : 2, 11, 20, 29
शुभ अंक : 2, 11, 20, 29, 56, 65, 92
शुभ वर्ष : 2027, 2029, 2036
ईष्टदेव : महादेव, भैरव
शुभ रंग : पांढरा, हलका निळा, ग्रे
कसे राहील हे वर्ष
ज्या लोकांची जन्म तारीख 2, 11, 20, 29 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष अती उत्तम राहणार आहे. महत्त्वपूर्ण कामात नक्कीच यश मिळेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला सफलता मिळेल. नोकरी करणार्या व्यक्तींसाठी हा काळ प्रगतीकारक असेल. मानसिक सुख-शांती मिळेल. शुभवार्ता कानी पडेल. शत्रू प्रभावहीन होतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. व्यापारी वर्ग अनुकूल स्थितीत असतील. दांपत्य जीवन मधुर राहील.
मूलक 2च्या प्रभावात येणारे विशेष व्यक्ती
* महात्मा गांधी
* अमिताभ बच्चन
* हिटलर
* लाल बहादूर शास्त्री
* थॉमस अल्वा एडिसन
* टीना अंबानी
