Vedic Astrology, Astrology Predictions, Daily Astro | आज तुमचा वाढदिवस आहे (31.01.2013)
WD
शुभ दिनांक : 4, 8, 13, 22, 26, 31
शुभ अंक : 4, 8,18, 22, 45, 57
शुभ वर्ष : 2015, 2020, 2031, 2040, 2060
ईष्टदेव : गणपती, मारुती
शुभ रंग : निळा, काळा, भुरकट
कसे राहील हे वर्ष
ज्या लोकांची जन्म तारीख 4, 13, 22, 31 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष थोडे सावधगिरी बाळगण्याचे आहे. वर्षाचा स्वामी गुरु व मूलक स्वामी राहू यांच्यात परम शत्रुता आहे. गुरु-राहूची युती चांडाल योग निर्माण करते. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. पारिवारिक जीवनात सतर्कता ठेवणे गरजेचे आहे. नवीन रोजगार जानेवारीनंतर मिळण्याचे योग आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. शत्रू पक्षाकडून सांभाळून राहा. कर्मक्षेत्रात विशिष्ट कामांमुळे वेळ जाईल. काम जास्त असल्याने थकवा जाणवेल. व्यवसायात हानी संभव. उगाच पैसा उधळू नये. वेळ जाऊ देऊ नका. हा फार उपयोगाचा आहे लक्षात ठेवावे.
मूलक 4चे प्रभावशाली विशेष व्यक्ती
* जार्ज वाशिंगटन
* रितु शिवपुरी
* नम्रता शिरोडकर
* उर्मिला मार्तोंडकर
* जावेद जाफरी
