1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2013
  6. केतू ग्रहाच्या शांतीचे सोपे उपाय!

केतू ग्रहाच्या शांतीचे सोपे उपाय!

WD
राहू- केतुला ज्योतिषशास्त्रात छाया ग्रह (उपग्रह) म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार राहुला असूराचे वरील धड तर केतुला शेपटाचा भाग समजला जातो. या पध्दतीने विचार केल्यास केतूजवळ डोके नाही. यामुळे तो ज्या भावात ज्या ग्रहामध्ये रहतो त्यानुसार फळ देतो.

केतुचा सरळ संबंध मनाशी आहे. यामुळे केतुची निर्बल किंवा अशुभ परिस्थिती चंद्र अर्थात मनाला प्रभावित करून आत्मबल कमी करते. केतुपासून प्रभावी व्यक्ती नेहमी नैराश्याने ग्रस्त असते. घाबरणे, वाईट स्वप्न पडणे हे प्रकार केतुमुळे होतात. केतू आणि चंद्राची युती-प्रतियुती झाल्यास व्यक्ती मानसिक रोगी होतो. तसेच त्याची व्यसनाधीनता वाढते.

केतू नेहमी लग्न, द्वितीय, चतुर्थ, सप्तम, अष्टम, दशम व व्ययमध्ये चांगले फळ देत नाही. तृतीय, पंचम, षष्ठ, नवम व एकादशमध्ये केतू चांगले फळ देतो. तसेच मेष, वृषभ, मिथून, कन्या, धनू व मीन राशि मध्ये केतू चांगले फळ देतो.

कुंडलीत केतू अशुभ भावात बसला असेल तर त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे, अन्यथा त्या व्यक्तीस कायम कठीण प्रसंगांना समोरे जावे लागेल.

WD
केतु ग्रहाचे शांतीचे उपाय

1. केतुपासून बचावाचा सर्वांत चांगला उपाय म्हणजे नेहमी प्रसन्न रहावे. नेहमी हसत रहावे, यामुळे केतू आपल्या मनाला वश करु शकणार नाही.
2. नियमित गणरायाची पुजा आणि दर्शन करावे.
3. कामगार, अपंग व्यक्तींना यथाशक्ती मदत करावी.
4. काळ्या रंगाचा वापर करू नये.
5. सामाजिक कार्यात सहभाग वाढवावा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा