नोव्हेंबर महिन्यातील तुमचे भविष्य
मेष (चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ)
महिन्याची सुरुवात कष्टप्रद होईल, पण १५ तारखेनंतर आर्थिक बाजूत सुधार होण्याची चिन्हे आहेत. पण शारीरिकदृष्ट्या उदर आणि गुडघ्याच्या दुखण्याचा त्रास होऊ शकतो. आप्तजनांची साथ तुम्हाला जीवनात पुढे जाण्याची प्रेरणा देत राहील. अपत्य-प्राप्तीचे सुख मिळण्याचे संकेत आहेत. जुन्या मित्रांच्या भेटी तुम्हाला साहाय्यकारी ठरतील. शत्रू शांत असतील. सर्व काही सामान्य राहील. उगीचच इथे-तिथे भटकणे टाळा. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा. चढ-उताराच्या दृष्टीने या महिन्याचा उत्तरार्ध ठीक असेल. अडलेली कामे पूर्ण होण्याची वेळ जवळ आली अहे.
वृषभ
कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होण्याची शक्यता संभवते. पत्नी व संततीपासून दु:ख होण्याची शक्यता संभवते. व्यापार-व्यवसाय सामान्य राहिल. विरोधकांना कमजोर समजण्याची चूक करू नका. महत्त्वरची कामे रखडतील. मानसिक क्रोध, चिडचिडपणावर नियंत्रण ठेवणे भाग पडेल. प्रगतीचा आलेख उंचावून समाधान लाभेल. आशाच्या मदतीने निराशा हळूहळू कमी होईल. पुढे जाण्याच्या संधी मिळतील. संबंध सुधारतील. विरोधीक, शत्रुपक्ष थंड पडतील. अचूक निर्णय घेऊ शकाल. चुकीची जाणीव होईल. नव विचार, उत्साह प्रगती साधण्यास फायदेशीर ठरेल. व्यापार, व्यवसायात प्रगती साधाल.
मिथुन (का, कि, कु, घ, ड., छ, खे, खो, हा)
या महिन्यात सर्वकाही मध्यम राहील. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या वातावरण अनुकूल नसेल. तुम्ही मानसिक दृष्ट्या त्रस्त राहाल. आप्तजनांकडून वाईट बातमी कळू शकेल. ज्याची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण तुमचा दरवाजा ठोठावणारच आहे. जुन्या कोर्ट-खटल्यांपासून सुटका मिळेल. वेळॆचा योग्य वापर करा. मनातल्या इच्छा पूर्ण होतील. स्वाध्यायात आवड वाढेल, व्यापार चालेल.
कर्क ( ही, ह, हे, हो, डा, डी, डू, डे, डो)
ही वेळ निव्वळ योजना आखण्याची नाही तर त्यावर अंमलबजावणी करण्याची आहे. अचानक एखाद्या दूरवरच्या प्रवासाला जाऊ शकता. जीवनात नवा आनंद प्राप्त होणारच आहे, खुल्या मनाने त्याचे स्वागत करा. एकाग्रचित्ताने काम करा, यश नक्की मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुठेतरी बाहेर फिरायलाही जाऊ शकाल. शत्रू तुमचे नुकसान करण्यासाठी टपून बसले आहेत, सावध राहा. परिवारात नवा आनंद येणार आहे. एकुणच हा महिना चांगलेच फळ देईल.