पायर्यांवर बसलेल्या बंड्याला एका माणसाने विचारले 'बेटा, तुझे वडील घरी आहे का? बंड्या- हो. तो माणूस पायर्या चढून वर जातो आणि बेल वाजवतो. त्यानंतर दार ठोकतो पण आतून काही उत्तर येत नाही. तेंव्हा चिडून बंड्याला म्हणतो, 'तू तर म्हटले होते की तुझे वडील घरी आहे.' बंड्या- खरं तर सांगितलं. हे कुठे माझं घर आहे. मी तर समोरच्या घरात रहातो.