गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. बाल मैफल
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

मला तरी कुठं येतंय

WD
प्रा. सबनीस आणि एक शेतकरी प्रवासात शेजारी बसले असताना प्राध्यापक म्हणाले, ''आपण एकमेकांना कोडी घालू या. चांगला वेळ जाईल. प्रत्येकवेळी ज्याला उत्तर येणार नाही त्यानं 10 रुपये द्यायचे.''
''साहेब, तो शेतकरी म्हणाला, तुम्ही माझ्याहून जास्त शिकलेल, मी तसा अडाणी. तेव्हा मी 5 रुपये देईन.''
''चालेल'' विचार तू प्रश्न.
शेतकर्‍याने प्रश्न विचारला, ''तीन पायांनी चालणारा आणि दोन पायांनी उडणारा प्राणी कुठला?''
प्राध्यापकांनी ूप विचार केला आणि शेवटी हार खाऊन ते म्हणाले,
''नाही बुवा तू सांग. हे घे दहा रुपये.''
त्यावर ' मला तरी कुठं येतंय' असं म्हणून
शेतकर्‍यानं ठरल्याप्रमाणे 5 रुपये दिले!