Dharma Sangrah
✕

माकडाचे काळीज

Updated: मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (08:43 IST)

तेव्हा मगरीचे आणि मगराचे खूप वादावादी होते. नंतर मगरी निक्षून सांगते की, ''मला जर ते काळीज आणून दिलं नाहीत तर मी उपास करून जीव देईन.''मगरीचे निकराचे बोलणे ऐकूण मगर दु:खी मनाने वानराचे काळीज आणण्यास निघतो. रक्तमुख मगराची वाट बघतच असतो. मगराचा दु:खी चेहरा बघून रक्तमुख विचारतो, ''काय रे... आज तुझा चेहरा दु:खी का?''
 
त्यावर मगर उद्‍गारतो, ''आज माझ्या बायकोने माझी खरडपट्टी काढली की मित्र एवढी जांभळे रोज देतो पण त्याला आपल्या घरी का नाही बोलवत?'' रक्तमुख उत्तरतो, ''अरे, पण मी समुद्रातल्या तुझ्या घरी येणार कसा? ''मी जमिनीवरचा प्राणी...! '' ''समुद्रात मध्यभागी वाळवंट आहे त्यात माझं घर आहे. तू माझ्या पाठीवर बस. मी तुला तिथं नेईन या मगराच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वानर त्याच्या पाठीवर बसतो.
 
समुद्राच्या मध्यभागी आल्यावर समुद्राच्या लाटांचा मारा वानराला सहन होईना. तेव्हा तो मगराला हळू जाण्यास सांगतो. तेव्हा मगर विचार करतो की आपण आपला हेतू वानराला सांगण्यास हरकत नाही. वानर पळून जाऊ शकत नाही. मगर रक्तमुख वानराला सांगतो, ''‍‍मित्रा, देवाचं नाव घे.मी तुला फसवून इथं आणलंय! कारण माझ्या बायकोला तुझं काळीज खायची तीव्र इच्छा झाली आहे.''
 
मगराचे बोलणे ऐकून वानर घाबरतो. पण तसे न दाखवता मगरास बोलतो, ''हात्तिच्या, एवढचं ना? ... अरे पण मी माझं काळीज जांभळाच्या ढोलीत ठेवतो. आधीच बोलला असतास तर किनार्‍यावरच देता आलं असतं!''
 
मगर त्यावर उत्तरतो, ''माझाच गाढवपणा झाला. आपण परत जाऊ किनार्‍यावर!'' वानराला मगराने किनार्‍यावर आणून सोडल्यावर वानर एका मोठ्या उडीत जांभळाचा शेंडा गाठतो. आणि मगराला सांगतो ''विश्वासघातकी मित्रा चालता हो इथून! नशीब माझं म्हणूनच वाचलो तुझ्या तावडीतून! काळजी थोडंच बाजूला काढता येतं का?''
 
मगराला आता पश्चात्ताप होतो की आपला हेतू आपण उगाचच आधी सांगितला. मगर पुन्हा वानराला सांगतो की, तुझी गम्मत केली. मी तुला मारणार नव्हतो.'' 
 
पण वानर सांगतो. ''तुझ्या विश्वासघाती स्वभावाचा एकदा अनुभव आल्यावर तुझ्या शब्दांवर माझा विश्वासच नाही. तू इथून तुझे तोंड काळे कर!
 
तात्पर्य : संकटाला न डगमगता धैर्याने तोंड दिले पाहिजे आणि विश्वासघातकी लोकांनां दूर ठेवले पाहिजे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments