suvichar
✕

पंचतंत्र : बगळा आणि मुंगूस

Updated: मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024 (16:35 IST)

उदास बगळ्याला पाहून खेकडा म्हणाला की, बगळे दादा काय झाले तुम्ही असे उदास का बसले आहात?त्यावर बगळा म्हणाला की, काय करू खेकडे दादा एक साप माझ्या पिल्लांना खाऊन टाकतो. समजत नाही आहे मी त्या सापाचा सामना कसा करू ते. तुमच्याकडे जर काही उपाय असेल तर मला सांगाल.   
 
आता खेकड्याने मनात विचार केला की, हा बगळा माझा जन्मजात शत्रू आहे, मी त्याला एक उपाय सांगेन जो सापासह त्याचा नाश करेल. आता खेकडा बगळ्याला म्हणाला की, एक काम करा, मांसाचे तुकडे घ्या आणि मुंगूसाच्या बिळासमोर  ठेवा. त्यानंतर त्या बिळापासून सापाच्या बिळापर्यंत अनेक तुकडे पसरवा. मुंगूस ते तुकडे खाऊन सापाच्या बिळापर्यंत येईल. आणि जर त्याला तिथे साप दिसला तर तो त्याला ठार करेल. बगळ्याला खेकड्याने सुचवलेली युक्ती आवडली. बगळ्यानेही तेच केले. तसेच ठरल्याप्रमाणे तसेच झाले. मुंगूसाने साप खाल्ला पण सापानंतर त्या झाडावर राहणाऱ्या बगळ्यांनाही खाऊन टाकले. बगळ्याने उपाय तर केला पण परंतु त्याचे इतर परिणाम विचारात घेतले नाहीत. त्याच्या मूर्खपणाचे फळ त्याला मिळाले.
तात्पर्य : कोणतेही कार्य करण्यापूर्वी आधी विचार करावा. 

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

Navratri Vrat Special Coconut Halwa उपवासाचा नारळ हलवा पाककृती

नसा बळकट ठेवायच्या आहेत? आहारात आजच समाविष्ट करा हे पोषक पदार्थ!

भूकंप अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे आहे? शैक्षणिक पात्रतेपासून पगारापर्यंत जाणून घ्या सर्वकाही

दुभंगलेल्या केसांचा त्रास दूर करायचा आहे? केसांची काळजी घेण्यासाठी अवलंबवा हे सोपे उपाय!

फक्त १० मिनिटांत तयार होणारी उपवासाची थालीपीठे; कमी साहित्यात चवदार नाश्ता

पुढील लेख
Show comments