पंचतंत्र : बेडूक आणि सापाची गोष्ट
एका पर्वतीय प्रदेश मध्ये मन्दविष नावाचा एक वृद्ध साप राहायचा. एक दिवस तो विचार करू लागला की, असे काय करता येईल की, श्रम न करता मला रोज जेवण मिळेल. असा कोणता उपाय करता येईल. त्याच्या मनामध्ये एक विचार आला, व तो बेडकांनी भरलेल्या तलावाजवळ गेला. तिथे पोहचल्यावर तो अस्वस्थ होत फिरू लागला. त्याला असे अस्वस्थ पाहून एका बेडकाने सापाला विचारले की, “मामा! आज काय झाले आहे?संध्याकाळ झाली आहे, तुम्ही जेवणाची काही व्यवस्था करीत नाही का?'' साप दुखी होत म्हणाला की, “बाळा काय करू, मला आता जेवणाची इच्छा राहिली नाही. मी सकाळीच जेवण शोधण्यासाठी निघालो होतो. एक तलावाजवळ मी एक बेडूक पहिला. मी त्याला पकडण्याचा विचार करत होतो. पण तिथे असलेले आजूबाजूचे काही ब्राह्मण अध्ययनात मग्न होते, तर तो बेडूक त्यांच्यामध्ये कुठेतरी लपला. मी त्याला पुन्हा पाहिले नाही. पण त्याला शोधण्याचा गोंधळात माझ्याकडून एका ब्राह्मणाच्या मुलाचा अंगठ्याला दंश झाला. माझ्या विषामुळे त्याचा तत्काळ मृत्यू झाला. हे पाहून त्याच्या वडिलांना खूप वाईट वाटले आणि त्याच्या वडिलांनी मला शाप दिला आणि म्हणाले की, "दुष्ट! तू माझ्या मुलाला कोणताही गुन्हा न करता चावा घेतला आहे, तुझ्या गुन्ह्यामुळे तुला बेडकांचे वाहन व्हावे लागेल.”
आता साप बेडकाला परत म्हणाला की, "मी इथे तुमच्याकडे फक्त तुमचे वाहन व्हावे या हेतूने आलो आहे."सापाचे हे ऐकून बेडूक आपल्या कुटुंबाकडे गेला आणि सापाने काय सांगितले ते सगळे त्याने सांगितले. अशा रीतीने ही बातमी सर्व बेडकांपर्यंत पोहोचली. त्यांचा राजा जलपाद यालाही याची बातमी लागली. हे ऐकून त्याला खूप आश्चर्य वाटले. आता सर्वजण सापाजवळ आले व जलपाद सापाच्या फणा वर चढला. त्याला बसवलेले पाहून बाकीचे सगळे बेडूक सापाच्या पाठीवर चढले. साप कोणालाच काही बोलला नाही. सापाच्या कोमल त्वचेला स्पर्श करून जलपादला खूप आनंद झाला. अशातच एक दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याने त्यांना बसवले तेव्हा तो निघाला नाही. त्याला पाहून जलपादाने विचारले, "काय झालं, आज तुला चालता येत नाही?" "हो, मला आज भूक लागली आहे त्यामुळे मला चालणे कठीण होत आहे." जलपाद म्हणाला, ठीक आहे तुम्ही छोट्या छोट्या बेडकांना आपले भक्षक बनवा व त्यांना खाऊन टाकत जा. आता साप हळूहळू सर्व बेडूक खाऊन टाकायला लागला. पण जलपादला समजले नाही की, तो आपल्या क्षणिक सुखासाठी आपल्याच वंशाला नष्ट करीत आहे. अशा प्रकारे सापाला रोज कोणतेही कष्ट न करता भक्ष्य मिळत होते. सर्व बेडूक खाल्ल्यानंतर एके दिवशी सापाने जलपादला देखील खाऊन टाकले. ज्यामुळे बेडकांचा संपूर्ण वंश नष्ट झाला.
तात्पर्य: कधीही कोणावर आंधळा विश्वास ठेऊ नये.
Edited By- Dhanashri Naik