Marathi Biodata Maker

कढीपत्ता फक्त पदार्थांमध्येच नाही तर स्वच्छतेसाठी देखील आहे फायदेशीर

Updated: सोमवार, 9 सप्टेंबर 2024 (16:32 IST)
 
कढीपत्त्याची उपयोग-
जर एखादे भांडे जळाले असले तर त्यासाठी कढीपत्त्याचे ताजे पाने घ्या. हे पाने बारीक करून त्याची पेस्ट बनवा.आता या पेस्टमध्ये नारळाचे तेल घालून मिक्स करावे. तुमची पॉलिशिंग पेस्ट तयार आहे. या पेस्टला भांड्यावर लावून पॉलिशिंग करावे. मसाज केल्यानंतर भांडे 15 मिनिट तसेच राहू द्यावे. यानंतर भांडे ओल्या कपड्याने पुसावे व नंतर पाण्याने धुवून घ्यावे.
 
जर तुमच्या स्वयंपाक घरात वास येत असेल तर वास दूर करण्यासाठी कढीपत्त्याचा उपयोग करू शकतात. याकरिता भांड्यामध्ये पाणी उकळवावे. आता यामध्ये मूठभर कढीपत्त्याचे पाने घालावे.आता हे कमीतकमी दहा मिनिट उकळू द्यावे. यामुळे पाण्याची वाफ होईल व या वाफेमुळे स्वयंपाक घरातील वास निघून जाण्यास मदत होईल. व नैसर्गिक वास दरवळेल.
 
स्वयंपाक घरात आपण भाजी आणून ठेवतो. तसेच स्वच्छता ठेवणे हे देखील महत्वाचे काम असते. कढीपत्ता अँटीबॅक्टिरियल असतो. म्हणून याकरिता कढीपत्त्याची पेस्ट बनवून घ्या. या पेस्टला स्वयंपाकघराचा स्लॅब, गॅस, टाईल्स आणि कटिंग बोर्ड, शेल्फ इतर ठिकाणी लावून ठेवावे. व 10 मिनिटांनी स्वच्छ करून घ्यावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

आयसीएसआय (ICSI) कडून २० कार्यकारी सहाय्यक पदांसाठी बी.कॉम (B.Com) उमेदवारांसाठी संधी

Hair Care Tips: दह्यात हे ४ पदार्थ मिसळून लावा, केस होतील लांब, दाट आणि मजबूत

वारंवार गॅस-आम्लपित्त? हे पोटाच्या गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

Parenting Tips: मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे प्रश्न कधीच विचारू नका

पंचतंत्र : घोडा आणि गाढव, धोबी

पुढील लेख
Show comments