रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: रविवार, 8 सप्टेंबर 2024 (07:00 IST)

लोणच्यातील तेल उरले असल्यास करा असा उपयोग

lonche
भारतातील प्रत्येक घरात लोणचे हे आवडीने बनवले जाते तसेच ते आवडीने देखील खाल्ले जाते. लहानांपासून तर मोठयांपर्यंत सर्वांना लोणचे मनापासून आवडते. पण अनेक वेळेस लोणचे संपल्यानंतर अनेक महिला लोणच्यामधील तेल टाकून देतात. असे कधीही करु नये. कारण आपण या तेलाचा परत उपयोग नक्कीच करू शकतो. तर चला आपण उरलेल्या या तेलाचा कश्याप्रकारे उपयोग करू शकतो हे जाणून घेऊ या.
 
पीठ मळतांना त्यामध्ये घालावे तेल-
पीठ मळतांना त्यामध्ये उरलेल्या लोणच्याचे तेल घालावे. यामुळे पीठ चिकटणार नाही व मऊ मळले जाईल. तसेच या लोणचाच्या तेलाचा स्वाद देखील पिठाला लागेल.
 
पुदिना किंवा टोमॅटो चटणी मध्ये करा उपयोग-
पुदिना किंवा टोमॅटोची चटणी बारीक करतांना त्यामध्ये लोणच्याचे तेल घालावे. यामुळे चटणी चवदार बनेल.
 
पराठे स्टफिंग मध्ये करा उपयोग-
पराठे स्टफिंग करिता तुम्ही उरलेल्या तेलाचा उपयोग करू शकतात. याशिवाय पराठे शेकण्यासाठी तेलाचा उपयोग करू शकतात ज्यामुळे पराठ्यांना चव येईल.
 
परत लोणचे बनवण्यासाठी करू शकतात उपयोग-
लोणच्यातील उरलेल्या तेलाचा उपयोग तुम्ही गाजर, मुळा, कैरी, मिर्ची यांचे लोणचे घालण्यासाठी देखील करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik