सोमवार, 28 एप्रिल 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह शायरी
Written By
Last Modified: सोमवार, 28 एप्रिल 2025 (18:16 IST)

Love Shayari Marathi मराठी शायरी

love
आठवण नको फक्त
तुझी साथ हवी,
केवळ तुझ्या आणि तुझ्याच
प्रेमाची वाट हवी…
 
रात्री आकाशात चांदण्या मोजत असतो,
चमकणाऱ्या प्रत्येक ताऱ्याकडे तुलाच मागत असतो…
 
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले कधी
तर हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील मला कधी तर
विश्वास माझ्यावर ठेवशील ना?
माझी होशील ना?
 
मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे तुला सांगतां येत नाही,
प्रेम हे असंच असतं ग,
ते शब्दात कधी
मांडता येत नाही.
 
जिथे तू असशील
तिथेच मी असेन,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आहे
तूच माझ्या जीवनाचा शेवट आहे
 
हृदय तोडून प्रेम कर,
मात्र प्रेम करून हृदय तोडू नकोस…
मी जगू शकणार नाही
हा खेळ चुकून खेळू नकोस
 
अबोल तू अस्वस्थ मी,
अक्षर तू शब्द मी,
समोर तू आनंदी मी,
सोबत तू संपूर्ण मी.
 
तु हसली आणि मी फसलो
कोण जाणे केव्हा
नकळत तुझ्या प्रेमात पडलो.
 
प्रेम असे असावे 
केवळ शब्दानेच नव्हे
तर 
नजरेने समजणारे असावे…
 
आयुष्य थोडसंच असाव..
मात्र जिथे बघू
तिथे फक्त तू दिसावं
 
प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न