अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना !समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावेमी हास सांगताच, रडताहि तू हसावे ते आज का नसावे, समजावणी पटे ना धरिला असा अबोला, की बोल बोलवेना !का भावली मिठाची, अश्रूंत होत आहेविरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना मिटवील अंतराला, ऐसी मिठि जुटे ना !की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंगघेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना ! गीत - आ. रा. देशपांडे ’अनिल’