1. लाईफस्टाईल
  2. »
  3. लव्ह स्टेशन
  4. »
  5. प्रेमगीत

आला पाऊस मातीच्या वासात गं

PR

आला पाऊस मातीच्या वासात गं

मोती गुंफित मोकळ्या केसात गं ।। धृ ।।

आभाळात आले, काळे काळे ढग

धारा कोसळल्या, निवे तगमग

धुंद दरवळ, धरणीच्या श्वासात गं ।। 1 ।।

कोसळल्या कश्या, सरीवर सरी

थेंब थेंब करी नाच पाण्यावरी

लाल ओहळ वाहती जोषात गं ।। 2 ।।

लिंबोळ्यांची रास कडूनिंबाखाली

वारा दंगा करी, जुई शहारली,

चाफा झुरतो, फुलांच्या भासात गं ।। 3 ।।आला पाऊस

About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा