शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. प्रेमाची गोष्ट
Written By

मुलींनो, सांभाळा

मुलींनो, तुम्हाला नम्रतेने विनंती आहे की, जर तुमचे कोणावर प्रेम असेल तर ते तुमच्या घरामधील व्यक्तीबरोबर शेअर करा व तो मुलगा कितपत तुमचा सांभाळ करू शकतो, याचापण विचार करा..
 
मान्य आहे की, प्रेम हे आंधळं असते, पण नंतर पश्‍चाताप करून घेण्यापेक्षा आताच सतर्क राहा..
 
कारण आई-वडिलांना दुखवून तुम्ही सुखी राहणार नाही. हा घाणेरडा समाज तुमच्या आई-वडिलांना जगू देणार का?
 
तेव्हा तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो की, ज्या आईने आपल्याला ९ महिने पोटामध्ये ठेऊन जे स्वत:चे रक्त देऊन स्वत:च्या उदरात वाढवून जे कष्ट घेतले त्याची परतफेड म्हणून त्यांना रडवून आपले स्वप्न पूर्ण करू नका.. त्या बापाचा विचार करा जो रडूही शकत नाही व आपले दु:खही कोणाजवळ व्यक्त करू शकत नाही. चार दिवसाच्या प्रेमांवर तुम्हाला एवढा विश्‍वास आहे व आपल्याला जन्म देणार्‍या आई-वडिलांची पर्वा नाही, त्यांना सोडून दुसर्‍याशी लग्न केल्यास जग तुम्हाला लोफर म्हणेल आणि तुमच्यासाठी एवढे कष्ट सोसलेल्या आई-वडिलांच काय.. चार दिवसाच्या केलेल्या प्रेमाशिवाय तुम्ही जगू शकत नाही म्हणता त्यावेळी त्या मायबापाच्या हृदयावर तुम्ही किती वार करीत आहात, याची कल्पना तुम्हाला आहे का? चार-पाच वर्षाच्या प्रेमासाठी तुम्ही जन्म देणार्‍या, कितीतरी वर्षे तुमच्यावर नि:स्वार्थ प्रेम करणार्‍या मायबापाला दु:खाच्या खोल दरीत लोटता..
 
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आईवडील तुमच्यासाठी कधीही वाईट विचार करू शकत नाही, ते नेहमी तुमच्या चांगल्याचाच विचार करतील..
 
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आई-वडिलांसारखे नि:स्वार्थ प्रेम दुसरी कोणतीही व्यक्ती करू शकत नाही. तेव्हा विचार करा व आपल्यामुळे आपल्या आई-वडिलांना मान खाली घालण्याची वेळ येऊ देऊ नका..
 
-  संजीवनी