शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By वेबदुनिया|

`डेटींग`वर जायचं नसेल तर...

मुला-मुलींनी ‘डेटींग’वर ही आजकाल एक फॅशन बनलीय. काही लोक टाईमपाससाठी डेटींगवर जातात तर काही मौज मस्तीसाठी. तर काही आपल्या ग्रुपमध्ये आपल्याला कुणी नावं ठेऊ नये म्हणून... पण, बहुतेकांसाठी आपल्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ व्यतीत करणं आणि त्या व्यक्तीला जवळून ओळखणं महत्त्वाचं असतं. भावनेनं त्यांच्याजवळ जाणं त्यांना महत्त्वाचं वाटतं.
 
पाश्चिमात्य ‘डेटींग’ योग्य की अयोग्य यावर बरीच चर्चा झडू शकते. फायदे आहेत तसे तोटेही आहेत... आणि जर दोघांपैकी एकाला डेटींगवर जायचंय पण दुसऱ्याला नाही तेव्हा काय करावं हा प्रश्नही उभा राहतो. अशावेळी छोट्या छोट्या समस्यादेखील दोघांमध्ये वितुष्ट निर्माण करू शकतात. हेच वितुष्ट निर्माण होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो, याबद्दल जाणून घेऊयात... 
आपण पुन्हा कधी तरी जाऊयात...

आपण पुन्हा कधी तरी जाऊयात...

WD

तुमचं मन आज डेटींगवर जाण्यासाठी तयार नसेल तर शांतपणे तसं सांगा... पण, सोबतच भविष्यात आपण जाऊया असं सांगायलाही विसरू नका. त्या व्यक्तीला प्रेमानं सांगा की आज नाही, पण तुझ्याबरोबर डेटींगवर यायला मला नक्की आवडेल.

आपली प्राथमिकता मनमोकळेपणानं व्यक्त करा....


आपली प्राथमिकता मनमोकळेपणानं व्यक्त करा....

WD

तुमच्याबरोबर डेटींगवर जाण्याची इच्छा कुणी व्यक्त केली तर त्याला अगोदर तुमची प्राथमिकता मनमोकळेपणानं सांगा... ती व्यक्तीही तुमचा अभ्यास, नोकरी किंवा आर्थिक गोष्टींशी संबंधीत असेल तर त्याच्याशी स्पष्टपणे बोला. यामुळे एकतर तुमची समस्या हलकी होईल आणि दुसरं म्हणजे पुढच्या वेळी ती व्यक्ती तुमची प्राथमिकता लक्षात ठेवेल.

स्पष्टपणे बोला...


स्पष्टपणे बोला

WD

बहुतेकदा तुम्ही ज्या व्यक्तीला केवळ मित्र मानता त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल प्रेम भावना निर्माण होऊ शकते. अशावेळेस त्यानं तुम्हाला डेटींगवर जाण्यासाठी विचारलं तर त्या व्यक्तीला तुम्ही त्याच्याबद्दल काय विचार करता ते स्पष्टपणे सांगा. होऊ शकतं की त्याला त्यावेळेस वाईट वाटेल पण भविष्यात त्या व्यक्तीला अंधारात ठेवण्यापेक्षा आणि आणखीन पेचात पडण्यापेक्षा / पाडण्यापेक्षा हे सोपं आहे. स्वत:च्या मनावर कोणताही दबाव घेऊ नका.

मॅसेजही पाठवू शकता


मॅसेजही पाठवू शकता

WD

तुम्हाला त्या व्यक्तीला सामोरं जाणं कठिण वाटत असेल किंवा तुमच्या हावभावांचा तुमच्या नात्यावर परिणाम होऊ शकेल अशी स्थिती असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला मॅसेजही करून डेटींगवर न जाण्याविषयी सांगू शकता.

खोटं बोलू नका


खोटं बोलू नका

WD

डेटींगवर जाण्यासाठी नकार दिला तर मनात अनेक विचार येतात पण तेव्हा ठामपणे नकार देणं हेच गरजेचं असतं. त्याला कारणंही वेगवेगळी असतात. त्यामुळे पहिल्यांदा नकार द्यायला शिका. खोटं बोलून तुमच्या समोरच्या माणसाचा तुमच्यावरच्या विश्वासाला तडा जाण्याची शक्यता असते.