शनिवार, 19 नोव्हेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Updated: गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (15:27 IST)

Girlfriend ला हे प्रश्न कधीही विचारु नका जर दीर्घकाळ नातं टिकवायचं असेल...

मुलगा असो वा मुलगी नातंं प्रत्येकासाठी खूप खास आणि महत्त्वाचे असते. आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीच्या प्रत्येक लहान-सहान गोष्टींची काळजी घेणे तसेच एकमेकांच्या भावना समजून घेणे हे नातेसंबंधात खूप महत्वाचे आहे. पण कधी- कधी नकळत देखील काही गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्या मैत्रिणीला कधीही विचारु नये अन्यथा तिला राग येऊ शकतो किंवा काही चुकीचे झाले तर ते नाते तुटण्यास कारणीभूत ठरू शकते. अशा परिस्थितीत गर्लफ्रेंडला कोणते प्रश्न विचारू नयेत हे जाणून घ्या.
 
भूतकाळ किंवा एक्सबद्दल
आपल्या गर्लफ्रेंडला तिच्या भूतकाळातील संबंध किंवा एक्सबद्दल कधीही विचारू नका. ती स्वत: याबद्दल तुमच्याशी बोलत असेल तर ठीक पण तुम्ही विषय काढू नये. मुली बहुतेकदा त्यांच्या माजी प्रियकराबद्दल भावनिक असतात आणि नवीन नात्यात त्या द्दल कोणाशीही बोलू इच्छित नसतात.
 
मित्रांबद्दल
आजकाल प्रत्येकाला मुल-मुली दोन्ही मित्र असतात. अशात फक्त तुमच्या मैत्रिणींच्या मुलीच मैत्रिणी असाव्यात असे नाही म्हणून तिला तिच्या पुरुष मित्रांबद्दल विचारणे किंवा भेटण्यापासून रोखणे तिला नाराज करु शकतं.

पासवर्ड
सोशल मीडियावर सक्रिय असणार्‍या या जनरेशनसाठी पासवर्ड हा अगदी पर्सनल असतं. अशात तिच्या सोशल मीडिया अकाउंटचा पासवर्ड विचारल्यास तिला वाईट वाटू शकते.
 
खर्चांबद्दल
तुमच्या मैत्रिणीला किती पॉकेटमनी मिळते किंवा तिचा पगार किती आहे वा ती कसं काय मॅनेज करते असे प्रश्न कधीही विचारू नका. कारण तुमची तिच्या पैशावर नजर असल्याचे तिला वाटू शकते. किंवा प्रियकर खर्च टाळू इच्छितो म्हणून इतके प्रश्न विचारत असल्याचे जाणू शकतं. म्हणूनच जर तुम्हाला दीर्घ नातेसंबंध हवे असतील तर असे प्रश्न विचारणे नक्कीच  टाळावे.