शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By

या प्रकाराच्या पुरुषांवर जीव येतो मुलींचा

मुलांसाठी हे समजणे अवघड जातं की मुलींना अखेर आवडत तरी काय. पण यावर अधिक विचार करण्याची गरज नाही कारण एका शोधाप्रमाणे आज देखील मुलींना मस्कुलर पुरुष अधिक आवडतात. रिसर्चच्या आधारावर सिद्ध झाले आहे की महिला फिजिकली फिट, 6 फूट उंच आणि मसल्समॅनला पसंत करतात.
 
ऑस्ट्रेलियाच्या एका शोधात सुमारे दीडशे महिलांच्या समूहाला शर्टलेस पुरुषांचे फोटो दाखवण्यात आले, त्यातून अधिक महिलांनी त्या पुरुषांना पसंत केले ज्यांचे शरीर टोन्ड, उंची 6 फूट आणि शरीरावर एक्सट्रा फॅट्स किंवा कमजोरी नव्हती.
 
रिसर्चप्रमाणे आज देखील महिला फिजिकल स्ट्रेंथ असलेल्या पुरुषांकडे आकर्षित होतात. शारीरिक ताकदीला पुरुषांच्या आकर्षणाचा 70 टक्के भाग मानला गेला आहे. यात कोणीही शारीरिक रूपाने कमी मस्कुलर पुरुषाला पसंत केले नाही.
 
या अध्ययन हे देखील कळले की महिलांना मध्यम फिजिकल स्ट्रेंथ असलेले पुरुष अधिक आकर्षित करतात. त्यांना आवश्यकतेपेक्षा अधिक बल्की आणि अधिक कमजोर दोन्ही प्रकारे पुरुष मुळीच आवडत नाही.